रोटरी क्लब तर्फे रिफ्लेक्टर्स बसवण्याच्या कामास सुरुवात

Admin



    सांगली :  डिजिटल हॅलो प्रभात 
रोटरी क्लब ऑफ सांगली तर्फे आज छ.शाहु महाराज मार्ग(१०० फुटी रोड) येथील स्ट्रीट लाईटच्या खांबांवर रिफ्लेक्टर्स बसवण्याच्या कामास आज दि.२६ जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली.
    या प्रकल्पाचे उद्घाटन सां.मि.कु महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल  रोकडे व नगरसेवक अभिजीत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. राहुल रोकडे यांनी महापालिके तर्फे रोटरी क्लब ऑफ सांगलीचे आभार मानले. तसेच या प्रकल्पामुळे १०० फुटी रोड वरील अपघात कमी होण्यास मदत होणार आहे असे उद्गार नगरसेवक अभिजीत भोसले यांनी काढले.
    यावेळी कार्यक्रमास क्लबचे अध्यक्ष रो.सचिन कोले,सचिव रो.मनिष मराठे, PDG रो.सनतकुमार आरवाडे, PDG रो.रविकीरण कुलकर्णी,रो.सुरेश पाटील,रो.उदय पाटील,रो.अरुण दांडेकर,रो.रामकृष्ण चितळे,रो.सलील लिमये, रो.डाॅ.आकाश लवटे,रो.प्रतीक बगारीया, रो.अभय भगाटे,रो.प्रमोद पाटील,रो.अजय शहा हे रोटरी सदस्य उपस्थित  होते. 
To Top