हळदी कुंकू चा समारंभ परिवर्तनाच्या वाटेवर : ज्योती आदाटे

Admin

 


सांगली :
 डिजिटल हॅलो प्रभात 

    वारणाली परिसरात हळदी कुंकू चा महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव ज्योती आदाटे होत्या. 

    हा समारंभ खरंच आगळा वेगळा आहे.रथसप्तमी असेपर्यंत धार्मिक रितीरिवाजानुसार महिला वर्ग आपापल्या पद्धतीने हळदी कुंकूचा कार्यक्रम घेत असतात परंतु हा हळदी कुंकूचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने फक्त सुवासिनींचा नसुन सर्वच महिला वर्गाचा आहे. त्यामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटीता या महिलांचा ही समावेश आहे. म्हणुनच अशा कार्यक्रमांना विषेश महत्व आहे. कारण आपण बघतच असतो, की विधवा महिलेचा अशा कार्यक्रमांना येणे अशुभ समजले जाते. तिला बोलावलं जातं नाही, तिरस्कार केला जातो. हे चुकीचे आहे. आपणच आपल्या स्त्रीत्वाचा अपमान केल्यासारखे आहे. ती आधीच खचलेली असते आणि आपले असे वागणे म्हणजे तिच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. तेंव्हा कृपा करुन विधवा परित्यक्ता घटस्फोटीता महिलांना सन्मानाने वागवा त्यांचा अनादर करु नका, असे आवाहन ज्योती आदाटे यांनी केले.

    त्या पुढे म्हणाल्या,  या भागातील सामाजिक कार्यकर्त्या संगिता ताई जाधव यांनी परंपरेला फाटा देऊन पारंपरिक वाण द्यायची परंपरा सोडुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकाचे वाटप करून सावित्रीबाईंचे विचार घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक वाटले. या आपल्या सावित्रीमाऊलीचा  आदर्श सर्वांनी घ्यावा ही विनंती. यावेळी महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे, सामाजिक न्याय विभागाची अध्यक्षा सुरेखा सातपुते, शोभा भोरखडे, स्नेहा खोत, आक्काताई दळवाई, नीलकमल करपे, पुनम पाटील उपस्थित होत्या.

To Top