मिरज : डिजिटल हॅलो प्रभात
ग्रोईंग चाइल्ड प्ले स्कूल व रघुनंदन बालमंदिर, हरिपूर येथे गुरुवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी अनघा ग्रामीण व विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व शाळेच्या संचालिका अनघा कुलकर्णी, सचिव अजित वडार यांची प्रमुख उपस्थिती होती. अनघा कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी महिला शिक्षक वृंदाने देशभक्तीपर गाणी म्हटली. शाळेने प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरीद्वारे विद्यार्थ्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ ' असा संदेश दिला.
यावेळी अनघा कुलकर्णी यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा करतात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमात यावेळी ध्वजवंदन, ध्वजगीत, राष्ट्रगीत, कवायत, लेझीम योगासने , समूहनृत्य , समूहगीते , विद्यार्थी भाषणे झाली. कार्यक्रमानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सुषमा कोलप, दिपाली ओतारी, रजनी माळी, सई पेंडसे, घोरपडे , पुनम उपाध्ये, तनुजा चव्हाण, खाडिलकर व बनसोडे उपस्थित होते.