सतरा वर्षापासून फरारी असलेला गजाआड.
सांगली : फसवणूकीच्या गुन्ह्यात गेल्या सतरा वर्षापासून फरारी असलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी जेरबंद केले. निलेश निळकंठ शेवाळे (रा. गणेशनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यात आरोपी निलेश शेवाळे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होता. तो फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. मंगळवार दि. ३१ रोजी निलेश हा बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. काही वेळात तेथे एक संशयास्पद इसम फिरताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याने आपण फरारी असल्याची कबुली दिली. निलेश याला अटक करण्यात आली असून त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.