"शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय काही करता येणार नाही" : मंत्री दीपक केसरकर याचा उद्धव ठाकरेंना टोला

Admin


 कोल्हापूर : डिजिटल हॅलो प्रभात 

उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत, त्यांना शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय काही करता येणार नाही, असा टोला मंत्री दीपक केसरकर यांना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वापासून दूर व्हा असे सांगितले नव्हते असेही केसरकरांनी म्हटले आहे. 

नेमके काय म्हणाले केसरकर - दीपक केसरकर म्हणाले की, मला एक दिवस पंतप्रधान करा, 370 कलम रद्द करतो, असं सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा उद्धव ठाकरेंनी यांनी सोडून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा गेला, आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, वंचित बहुजन आघाडीचा वारसाही चालवायचा असेल, तर तो चालवावा. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना-भाजप युती निर्माण केली असेही केसरकर यांनी सांगितले. तर आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगायला हवा, कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत ते त्यांनी थांबवावे, अशी टीकाही दीपक केसरकर यांनी केला आहे. 

    केसरकर पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या रस्त्यांची महापूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला तत्काळ 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी विशेषबाब म्हणून 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नागरिकांना चांगले व उत्कृष्ट रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध होतील.
कोल्हापुरात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

To Top