वुमेन्स प्रिमियर लीग 2023 साठी मुंबई इंडियन्स महिला संघाच्या जर्सीचे अनावरण

Admin


 

मुंबई  : डिजिटल हॅलो प्रभात 
वुमेन्स प्रिमियर लीग चा पहिला हंगाम यंदा खेळवला जात असून काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 57 भारतीय महिला खेळाडूंना खरेदी करण्यात आलं. दरम्यान पुरुषांच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी  संघ मुंबई इंडियन्सने महिला आयपीएलमध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला कर्णधार म्हणून खरेदी केलं आहे. दरम्यान आता मुंबई इंडियन्सने आपली निळ्या रंगाची खास जर्सीही सर्वांसमोर आणली आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापूर्वी मुंबई इंडियन्सने आपली जर्सी जाहीर केली आहे. मुंबईने एक खास फोटो शेअर करून या जर्सीचे अनावरण केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. 

मुंबईचा पहिला सामना रंगणार गुजरात सोबत : 
4 मार्चपासून महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम  सुरू होत आहे. पहिल्या सत्राचा सलामीचा सामना  आणि मुंबई विरूद्ध गुजरात यांच्यात होणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या लीगचा अंतिम सामना 26 मार्च रोजी बेब्रॉन स्टेडियम येथे  खेळवला जाईल. 

WPL 2023 साठी कसा आहे मुंबईचा संघ : 
हरमनप्रीत कौर(कर्णधार), यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, नाटे स्क्राइव्हर, धारा गुजर, सायका इश्के, इसी वोंग, क्लोए ट्रायन, क्लोए ट्रायव्हन, इश्के, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, जिंतीमनी कलिता, प्रियांका बाला, हीदर ग्रॅहम, अमनजोत कौर.  
Tags
To Top