जयंत पाटील साहेब जातीवादी नाहीत : उत्तमराव कांबळे

Admin

 


सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आ.जयंत पाटील यांच्यावर काल एम.आय.एम चे जिल्हाध्यक्ष डॉ.महेश कांबळे यांनी टीका केली होती. 
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पलटवार केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले , छत्रपती शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव खा.शरद पवार साहेबांनी दिले आहे. राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. आमचे मा. जयंत पाटील यांनी पालकमंत्री असताना ज्या समिती वर विद्यमान आमदार अध्यक्ष असतात अशा संजय गांधी निराधार योजना समिती च्या अध्यक्ष पदावर वंदना चंदनशिवे यांची मिरज अध्यक्षपदी व ज्योती अदाटे यांची सांगली शहर अध्यक्षपदी निवड  केली, तसेच महानगरपालिकेमध्ये शेडजी मोहिते यांना देखील विरोधी पक्ष नेते म्हणून संधी दिली होती. 


सांगली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणीचे काम हे देखील आ.जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज व महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधान परिषदेवर राम पंडागळे,प्रकाश गजभिये,जयदेव गायकवाड यांना ही घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये बौद्ध , मातंग या समाजांसह सर्वच मागासवर्गीय समाजातील पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक मिळते व त्यांना विविध ठिकाणी चांगली मानाची पदे ही दिली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पार्टी व आमचे नेते आदरणीय जयंत पाटील हे जातीवादी नाहीत
ज्या माणसाकडून असे आरोप होत आहेत त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. त्यांना कोणताही अधिकार नाही आमच्या पक्षावर, जयंत पाटील यांच्यावर टीका करण्याचा. यापुढे जर त्यांनी टीका केली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे उत्तम कांबळे म्हणाले.


To Top