अमृत चौगुले आणि आबासाहेब पाटील यांचे स्वगत करताना समूह संपादक संजय भोकरे |
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
दैनिक जनप्रवासच्या कार्यकारी संपादकपदी अमृत चौगुले तर व्यवस्थापकीय संपादकपदी आबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दैनिक जनप्रवासच्या मुख्य कार्यालयात समूह संपादक संजय भोकरे यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी श्री. भोकरे यांनी दोघांचे स्वागत केले.
अमृत चौगुले यांनी अग्रदूत , केसरी लोकमत , पुढारी या दैनिकांमध्ये काम केले आहे. पुढारी सांगली आवृत्तीत ते उपसंपादक म्हणून काम पाहत होते . त्यानंतर त्यांना पुढारीच्या सोलापूर आवृत्तीत न्युज ब्युरो चीफ , आवृत्ती प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.
आबासाहेब पाटील यांनी सांगली , कोल्हापूर , पुणे येथे लोकमत, पुढारीमध्ये जाहीरात प्रमुख म्हणून काम केले आहे . दै. जनशक्तीमध्ये सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांनी आपले एफ.एम. तसेच टोमॅटो एफ. एम.मध्ये युनिट हेड म्हणून काम केले आहे. पदभार स्विकारल्यानंतर बोलताना अमृत चौगुले व आबासाहेब पाटील म्हणाले की , दै . जनप्रवासने आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो आम्ही सार्थ करून दाखवू .