सायरस पुनावाला स्कूलचे विद्यार्थी पोहोचले पेट्रोनॉस टॉवरवर

Admin

 

शाळेची ट्रीप मलेशियाला : आंतरराष्ट्रीय सहलीचा स्मरणीय अनुभव

पेठवडगाव : डिजिटल हॅलो प्रभात 
शालेय सहली या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि आवडीनिवडीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतात. म्हणून पेठ वडगाव येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरन’शनल स्कूलच्या माध्यमातून  परदेशी सहलीचे आयोजन करण्यात येते. यंदा पुनावाला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मलेशिया देशाचा दौरा करत प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत जगप्रसिद्ध गगनचूंबी इमारत असलेल्या पेट्रोनॉस टॉवरवर जाण्याचा आनंद लुटला   
कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षाने स्कूलची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहल यंदा मलेशिया देशाला गेली होती. या प्रवास आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना भेटी देताना विद्यार्थ्यांना मौजमस्तीसोबतच नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. १६ ते २३ जानेवारी दरम्यान ही सहल यशस्वीपणे संप्पन झाली. मलेशियाची देशाची सहल विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी ठरली. आठ दिवसात विद्यार्थ्यी, शिक्षकांनी  विषूवृत्तीय जंगले, दुर्मिळ वन्यजीव, हॉरर शो, मलेशियन सायन्स आणि तंत्रज्ञान संग्रहालय, बाटू लेण्यांना भेटी देवून त्यांचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे कौलालंपूर, मल्लाका, सुनियोजित पुत्रजया शहराला भेटी देवून पर्यटनाची मौज केली. यावेळी जंगल सफारी, बोट फेरी, चॉकलेट फक्टरीची भन्नाट सफर विद्यार्थ्यांनी स्वप्ननीय अनुभव देणारी होती. आशिया खंडातील सर्वात लांब व जलद  केबल कार सेवेने सर्वांना प्रभावित केले. त्याचप्रमाणे  भगवान मुरुगनची मूर्ती, गगनचुंबी इमारती, इंडोअर थीम पार्क, सनवे लगून थीम पार्कमुळे मलेशियाची प्रगती कळाली.  ३५ विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी या आंतरराष्ट्रीय सहलीत सहभाग नोंदवला होता. .
या सहलीत शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ,  प्राचार्य सरदार जाधव, शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. ड्रीमवर्ड टूर संस्थेकडून सहलीचे नियोजन करण्यात आले होते.


To Top