महाराष्ट्राची लावण्यवती सिजन २ चा दिमाखदार सोहळा |
पुणे : डिजिटल हॅलो प्रभात (मुज्जम्मील शेख)
नटने, सजने, सावरणे हा महिलांचा नैसर्गिक गुणधर्म आणि महिलांच्या याच कलागुणांना प्रोत्साहीत करण्यासाठी नीता रझदान कौल नेहमी अग्रेसर असतात, महिला सशक्तीकरणा करता अनेक कौशल्य विकास मार्गदर्शन आणि विविध स्पर्धेचे आयोजन त्यांच्या मार्फत करण्यात येत असते. महाराष्ट्राची लावण्यवती सिजन २ चा दिमाखदार सोहळा पुण्यातील क्रेटिव्ह सिटी येथे नुकताच पार पडला. अलीकडे सौंदर्यस्पर्धा ह्या फक्त स्त्रीवर्गाशी निगडित न राहता लहान मुले, पुरुष यांमध्येही होतात, सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप शारीरिक सौंदर्य एवढ्या-पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते. नीता राजदान कौल आणि ऑनलाइन लेडीज क्लब यांच्या संकल्पनेतून मराठी महिलांना जागतिक पातळीच्या सौंदर्य स्पेर्धेचा सराव व्हावा आणि बहुमोल असे अनुभव मिळावे या करता महाराष्ट्राची लावण्यवती ही भव्य दिव्य सौंदर्यवती स्पर्धा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रातील शेकडो सौंदर्यवतींनी अस्सल महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून या स्पेर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या सौंदर्य आणि बौद्धिक कौशल्याचे दिमाखदार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला सिनेसृष्टी, ब्युटी इंडस्ट्री, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिगग्ज मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि स्पर्धकांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.