शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
सांगली जिल्ह्यातील शिराळा गाव हे जगप्रसिध्द नागपंचमी तसेच महायोगी गोरखनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गांव जवळपास २० हजार लोकसंख्या असलेले गांव शिराळा गांव हे चर्चेत आले ते शिराळा पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल शिराळा पोलीस स्टेशन म्हटलं की एक आदर्श पोलीस स्टेशन शिराळा पोलीस स्टेशनमध्ये ५३ पोलीस कर्मचारी वर्ग पोलीस स्टेशनचा कारभार पाहतात .शिराळा पोलीस स्टेशनमध्ये मांगले, सांगाव ,वाकुर्डे ,शिरशी,तसेच लहानसहान गांवे येतात.शिराळा पोलीस स्टेशनला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला तसेच देशात सातवा क्रमांक पटकावला. शिराळा पोलीस स्टेशनचे सगळीकडे कौतुक झाले.शिराळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील घोगडे ,विशाल पाटील,प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चिल्यावार साहेब यांच्या उत्तम नियोजन यामुळे भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगली जिल्ह्यातील शिराळा ग्रामीण पोलीस ठाण्याची २०२१ सालासाठी सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून निवड केली. शिराळा पोलीस स्टेशनला सर्वोत्तम करण्यात ज्यांनी खारीचा वाटा उचलला ते म्हणजे शिराळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कान्स्टेबल दिपक शिवाजी खोमणे हे बकल नंबर २६२० हे गेली सात वर्षे शिराळा पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावत आहेत. शिराळा बिटचे अंमलदार म्हणून त्यांनी गेली ४वर्षकाम पाहत आहेत.पोलीस ठाण्याची सुरक्षा ,स्वच्छता व्यवस्था, गुन्हांची प्रकरणे, तपास पद्धत ,गुन्हे शोधण्याची पध्दत जूनी प्रकरणे निकाली काढणे, कायदा व सुव्यवस्था यांचे काम त्यांनी उत्कर्ष पद्धतीने राबवली आहेत. लोकांच्या येणाऱ्या तक्रारी बाबतचे निवारण करणे. शिराळा गावातील सर्व जाती, धर्म,भेदभाव ,राखून सलोखा निर्माण केला. शिराळा गावातील नागपंचमी, गोरखनाथ यात्रा योग्य नियोजन करून लोकांना कायदाचे महत्व पटवून दिले.यांमध्ये त्याना शिराळा पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचारीचे महिला पोलीस कर्मचारी यांचे योगदान लाभले.२०२१सालातील महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून शिराळा पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक पटकावला. हे शक्य झाले ते पोलीस हेड काँन्स्टेबल दिपक खोमणे यांच्या उत्कृष्ट नियोजन मुळे तसेच पोलीस खात्यामध्ये १८ वर्ष केलेले काम. याकामी त्याचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी शिवाजी खोमणे यांचे मार्गदर्शन तसेच घरातील वडिलांचा पोलीस दलातील अनुभव कामी आला.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील (आबा)यांचे स्वप्न होते कि महाराष्ट्र राज्य तंटामुक्त व्हावे.यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावोगावी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून लोकांना नेमले.स्वर्गीय आर आर पाटील आबाच्या पश्चात त्याच्याच सांगली जिल्हातील शिराळा पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्रथम क्रमांक पटकावला हे कौतुकास्पद आहे. असे शिराळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिपक खोमणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मिळावेत.