जत/हॅलो प्रभात:- आदिवासी पारधी महासंघाच्या सांगली जिल्हाअध्यक्ष पदी जत येथील बसवराज चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली शनिवारी दि. १८ मार्च रोजी धाराशिव (उस्मानाबाद) येथे राज्य कार्यकारणीच्या सभेत आदिवासी पारधी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश, कार्यकारणी तर्फे ही नियुक्ती करण्यात अली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्वसाधारण सभेत एका ठरावानुसार सर्वानुमते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, आपण आजपर्यंत सामाजिक व आदिवासी पारधी समाजाच्या हक्कासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन आपणास या पदी नियुक्त करण्यात येत आहे.
तसेच यावेळी इतर एकूण दहा जिल्ह्यांची अध्यक्ष पदांची निवड करून त्यांना नियुक्त पद आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे तसेच महासचिव राणाजी सोनवणे व आदिवासी पारधी महासंघाचे कार्याध्यक्ष माननीय सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली दहा जिल्ह्यांचे अध्यक्षपद निवड करण्यात आली. सर्व जिल्हाध्यक्षांना पुढील सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन व सामाजिक संघटन तसेच समाजातील तळागाळातील सर्वसामान्य आदिवासी बांधवांपर्यंत आदिवासी विभागाकडून विविध योजनेचे लाभ, कशा पद्धतीने पोहोचवण्यात येईल व त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरीता व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील खेडे, तांडा, वाड्या व वस्ती इत्यादी भागात आदिवासी पारधी महासंघाचे शाखा स्थापन करावे व संघटनेचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे तसेच संघटनेच्या माध्यमातून आपण व आपल्या समाजावर होणारे अन्याय दूर होऊ शकते असे सर्व अनमोल मार्गदर्शन व पुढील कार्यासाठी चांगल्या विचाराची शिदोरी संस्थापक अध्यक्ष साळुंखे व कार्याध्यक्ष काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन बापू पवार यांनी मानले.