पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनेसांगली मिरज व कुपवाड महापालिकेचे आयुक्तांना प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे याना जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले असून सदर निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.एकत्र बिल नको नागरिकांना त्रास नको दोन्ही विभाग (पाणी पट्टी व घर पट्टी) वेगळे ठेवा,सध्या पाणीपट्टी बिलामध्ये तसेच घरपट्टी पावती मध्ये दोन हजार रुपयेची (2000/-) तपावत दिसून आली आहे. संगणकाला वेगळी रक्कम बिलामध्ये वेगळी रक्कम असल्याचे निदर्शनास आले असून त्याला नागरिकांना तीव्र विरोध केला आहे त्या तफावतीचा जाहीर खुलासा करावा, पाणी बिलाची प्रत्येक दोन महिन्याला आकारणी करणेत यावी,नागरिकांना एक वर्षाच्या बिलाचा एकदम भरणा करणे कठीण होऊन आर्थिक तरतूद करणे म्हणजे ओढाताणीचे आहे.त्यामुळे प्रत्येकी दोन महिन्याला आकारणी व्हावी,घरपट्टी व पाणीपट्टी दोन्ही बिले एकत्र कोणत्याही विभागाकडे भरून घेण्याची तातडीने व्यवस्था करावी,पाणी बिल एकत्रित वर्षाचे देत असताना त्यामध्ये दंडाची आकारणी केली असून ती तातडीने रद्द करावी,नागरिकांना बिल भरणा करण्याकरता स्वतंत्र व्यवस्था सांगली मिरज आणि कुपवाड अशी करावी म्हणजे नागरिकांना सोयीचे होईल,सांगली मिरज व कुपवाड शहरामध्ये प्रभागा नुसार वसुली कार्यालये झालीच पाहिजेत,मीटर रिडींग साठी व वसुली यंत्रणा काळात प्रत्यक्षात कर्मचारी संख्या कमी पडते तरी कर्मचारी संख्या वाढवावी,घरपट्टी बिल व पाणी बिल काळात वसुलीसाठी कर्मचारी हे ऑफिसमध्येच कार्यरत राहून काम करतील त्यासाठी वसुली काळात क्यू आर कोड किंवा स्वतंत्र स्वॅप मशीन ची व्यवस्था करावी,हस्तलिखित पावत्या बंद व्हाव्यात त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल,प्रत्येक कर्मचाऱ्यांना स्वतंत्र भाग व वसुली कर्मचाऱ्यांना शिपाई द्यावा,पाणी बिलासाठी व घरपट्टी बिलासाठी स्वतंत्र आस्थापनाची व्यवस्था असून सुद्धा नागरिकांना ही दोन्ही बिले स्वतंत्र देण्यात यावीत,आरोग्य विभागाचे कोणतेही शुल्क घरपट्टीत न करता ते शुल्क आरोग्य विभागाने स्वतंत्र वसूल करावे.
सदर मागण्यांची कार्यवाही आठ दिवसात न झाल्यास महापालिकेसमोर एक दिवशीय उपोषणाचा इशारा देण्यात आला असूनसदर मागण्यांची कार्यवाही आठ दिवसात न झाल्यास महापालिकेसमोर एकदिवसीय उपोषणाचा इशारा देण्यात आला असून सदर निवेदनावर महापालिका क्षेत्र अध्यक्षा सुजाता कांबळे,शहर जिल्हाध्यक्ष शिला बनसोडे,वरिष्ठ जिल्हाध्यक्षा वनिता सोनवले,युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे इत्यादींच्या सह्या आहेत.