सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना लोकशाहीत महत्वाचा घटक समजल्या जाणार्या वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेते व कर्मचार्यांच्या प्रश्नांकडे मात्र शासनाने दुर्लक्ष केले आहे अशी खंत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
गेली अनेक वर्षे वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेेत्यांसह सर्वच कर्मचार्यांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी आहे. मात्र एक रूपयाचीही तरतूद नसणार्या अंघटतील क्षेत्रातील तीन कोटी लोकांसाठीच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा करत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनावर एकाही रूपयाचा भार पडू न देता कल्याणकारी मंडळ गठीत करण्याचा अहवाल शासकीय समितीनेच दिला आहे मात्र त्याकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गेली अनेक वर्षे आम्ही पाठपुरावा करत आहे,या अर्थसंकल्यपात घोषणा होईल अशी आशा होती मात्र ती फोल ठरली. यापुढे अधिक आक्रमकपणे आंदोलन उभारून कल्याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करू असा निर्धार आमच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा असल्याची माहीती श्री.सूर्यवंशी यांनी दिली.