नृसिंहवाडी : डिजिटल हॅलो प्रभात
दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे दिवसेंदिवस भाविकांची यात्रेकरूंची संख्या वाढतच आहे येथील गावाचे क्षेत्रफळ तिन्ही बाजूला नदी असल्यामुळे मर्यादित आहे ५ हजारच्या आसपास लोकसंख्या असले तरी बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे येथे घनकचऱ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो यावर आता ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे यासाठी नूतन उपसरपंच अमोल पुजारी यांनी सरपंच पार्वती कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत आरोग्य स्वच्छता विभाग कर्मचारी यांची बैठक घेऊन याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले आहे
घन कचरा व्यवस्थापन च्या कामात बेसुमार प्लास्टिक व खरकटे अन्न यांचे व्यवस्थापन या दोन मोठ्या समस्या आहेत.. उघड्यावर पडलेलं प्लॅस्टिक उन्हामुळे पेट घेते आणि त्यातून अतिशय घातक आणि विषारी वायू हवेत पसरून वायू प्रदूषण होते आणि खरकटे अन्न उघड्यावर पडल्यास त्यातून रोगराई व आजारांच्या साथी गावात पसरतात. हे आपण थांबवू शकतो पण त्यासाठी ग्रामपंचायत, स्वच्छता कर्मचारी आणि ग्रामस्थ या सगळ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.. यासाठी काही सूचना सगळ्यांनी पाळल्या तर कचऱ्याचा प्रश्न सुटू शकेल.. असा सूर या बैठकीमध्ये ग्रामपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधी स्वच्छता आरोग्य कर्मचारी यांचा होता
या बैठकीमध्ये उपसरपंच अमोल पुजारी ग्रामविकास अधिकारी बी एन टोणे दत्तात्रय चव्हाण सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद रिसबूड स्वच्छता कमिटी अध्यक्ष अविनाश निकम आदींनी स्वच्छता आरोग्य विभागाच्या कर्मचारी बरोबर चर्चा करून विविध सूचना केल्या यामध्ये ग्रामस्थांनी प्लॅस्टिक, खरकटे अन्न आणि ओला कचरा, हगीज व सॅनिटरी नॅपकिन्स, इतर सुका कचरा हे वेगवेगळ्या डब्यात साठवायला सुरुवात करावी, ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर मध्ये स्वतंत्र कंपार्टमेंट करावेत. विलगीकरण करूनच कचरा गोळा करावा. हगीज व सॅनिटरी नॅपकिन साठी ट्रॅक्टर बरोबर स्वतंत्र पोते ठेवावे व त्यातूनच ते गोळा करावे .. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य देखील सुरक्षित राहील. त्यानंतर डिस्ट्रॉंयींग मशीन मधून हगीज व सॅनिटरी नॅपकिन्स नष्ट करता येते तशा पद्धतीचे मशीन ग्रामपंचायत ने विकत घ्यावे. प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक्टर फिरवावे जेणेकरून त्यावेळी गावातील फक्त प्लॅस्टिकच तेवढे गोळा केले जाईल. प्लॅस्टिक साठी शिर्डींग मशीन घेण्याचा ग्रामपंचायतीचा उपक्रम स्तुत्य आहे , डुक्कर पाळणाऱ्या काही एजन्सी या खरकटे अन्न घेऊन जातात. त्यांच्याबरोबर नियोजन लावून खरकट्या अन्नाची विल्हेवाट लावावी, उरलेल्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करता येते, यापासून ग्रामपंचायतला उत्पन्नही मिळू शकते. ग्रामपंचायतीने आपल्या कर्मचाऱ्यांमधील एकाला ठराव करून. 'कचरा व्यवस्थापन अधिकारी' नेमावे व त्याला फक्त कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे एकच काम द्यावे.
गावामध्ये दिवसेंदिवस गर्दी ही वाढत जाणार आहे, जर आपण सगळ्यांनी मिळून व्यवस्थित नियोजन केले नाही तर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनेल. हे एकट्या ग्रामपंचायतचे काम नाही यामध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकांनी कचरा विलगीकरण करून स्वतःहून दिला पाहिजे आणि ग्रामपंचायतीवर विलगीकरण केलेल्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट
लावण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने योग्य ते मार्गदर्शन घेऊन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प राबवावा असे मार्गदर्शन व सूचना या बैठकीमध्ये करण्यात आले.
चौकट
या क्षेत्रावरील वाढती यात्रेकरूंची गर्दी लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे राबवणे गरजेचे असून याबाबत आम्ही नुकतीच कागल नगरपरिषदेने राबवलेल्या घरकचरा व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्याबाबत सर्व माहिती संकलन केली आहे त्याच धर्तीवर छोट्या प्रमाणात हा प्रकल्प नृसिंहवाडी ग्रामपंचायत जागेत सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध आहेत लवकरच कचरा व्यवस्थापन साठी मोठे शेड उभारण्यात येणार आहे यासाठीही पाठपुरावा सुरू आहे
- अमोल पुजारी
उपसरपंच नृसिंहवाडी
चौकट
घनकचरा व्यवस्थापना बाबतचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनीही यासाठी सहकार्य करणे गरजेचे असून ओला सुखा कचरा वेगवेगळ्या करून दिल्यास घनकचरा व्यवस्थापन करणे स्वच्छता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोयीचे पडणार आहे यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळ्या दोन बकेटमध्ये ठेवावा व ग्रामपंचायतीमार्फत येणाऱ्या घंटागाडी मध्ये ज्याप्रमाणे कंपार्टमेंट केले आहे त्यामध्ये टाकण्यासाठी द्यावा त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागू शकतो
- बी.एन.टोणे
ग्रामविकास अधिकारी नृसिंहवाडी ग्रामपंचायत