पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी : पर्यावरण मित्र सौ.श्वेता शिंदे.

Admin

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
पर्यावरणाने आपल्याला निःशुल्क दिलेल्या अनेक घटकांचा पुरेपूर वापर करतो,पण त्याचे ऋण फेडत नाही पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण मित्र सौ.श्वेता शिंदे यांनी व्यक्त केले. त्या चिखली (ता.शिराळा) येथे देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेजमध्ये आयोजित आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना पर्यावरण विषयक मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
         सौ.शिंदे पुढे म्हणाल्या,ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रम होतात.संयोजक उपस्थितांना काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतात.ही प्रथा बंद करून अशा वेळी औषधी वनस्पती भेट वस्तू म्हणून देण्याची प्रथा चालू ठेवणे गरजेचे आहे.शहरी भागातील अनेक ठिकाणे विविध उद्योगधंद्यामुळे प्रदूषित झाली आहेत.परंतु ग्रामीण भागातील काही ठिकाणे आजही पर्यावरणाची गुणवता राखून आहेत.त्याचे पावित्र्य राखण्याचा देखील प्रयत्न आपणा सर्वांकडून होणे गरजेचे आहे.तसेच शेतीमध्ये रासायनिक खतांचा होत असलेला वारेमाप वापर यामुळे पिकांचा त्याचबरोबर जमिनीचा दर्जा देखील ढासळत चालला आहे.
         वैयक्तिक स्वच्छता ,सार्वजनिक स्वच्छता,पाणी बचत,यासारखे उपक्रम तसेच,पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा कृती करुन पर्यावरण वाचवा या अभियानाचा प्रत्येकाने भाग बनणे गरजेचे आहे.त्याचबरोबर वर्षभरात अनेक उत्सव विविध ठिकाणी होत असतात.असे उत्सव साजरे करताना देखील पर्यावरण पूरक साजरे करणे काळाची गरज आहे.
      दरम्यान आपदा प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस,पोलीस पाटील,महसूल विभागाचे कर्मचारी,एन.आय.सी.चे विद्यार्थी,होमगार्ड सहभागी झाले होते.तसेच प्रशिक्षणासाठी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष अमरसिंह नाईक,यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.तसेच तहसिलदार गणेश शिंदे,नायब तहसिलदार अ.द.कोकाटे,महसूलचे कर्मचारी दिपक पारधी,सचिन बने यांचेही सहकार्य लाभले.प्रशिक्षक म्हणून दिया केन,रीना रॉय यांच्यासह अनेक कर्मचारी दिपक जाधव,किरण फातले उपस्थित होते.


To Top