सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार : पृथ्वीराज देशमुख

Admin

वांगी (ता.कडेगांव) येथे पक्षप्रवेश व पक्ष कार्यकारणी कार्यक्रमावेळी बोलताना सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख सोबत मान्यवर.
कडेपूर : डिजिटल हॅलो प्रभात 

           सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व गुण दोषासह स्विकारून त्याला ताकद देण्याचे काम केले. त्यामुळेच आता हा बदल दिसत आहे. आता सर्व गावांमध्ये आम्ही बरोबरीला आहोत. कडेगाव सारख्या शहरांमध्ये वीस वर्षापासून आम्हाला सत्ता नव्हती. आता तिथेही भाजपचा नगराध्यक्ष आहे. भाजप मध्ये दुसऱ्यांदा कधी जिल्हाध्यक्ष पद मिळत नाही. पण मला सलग दोनदा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान मिळाला. हे सर्व सर्वसामान्य दीन दुबळी, कष्टकरी जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी होते म्हणूनच शक्य झाले. त्यामुळेच यापुढे हि अशीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. ते वांगी (ता.कडेगाव) येथे पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते. 
यावेळी भारतीय मजदूर संघ प्रदेश मंत्री.विशाल मोहिते, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, दाजीराम मोहिते, मोहन बोडरे, अरूण पाटणकर प्रमुख उपस्थित होते.भाजपाच्या वांगी शहर पक्ष कार्यकारिणी पदाधिकारी निवडी यावेळी संपन्न झाल्या. नूतन पदाधिकाऱ्यांना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले. यामध्ये वांगी शहराध्यक्षपदी हणमंतराव मोहिते, उपाध्यक्ष बाळासाहेब वत्रे,अमोल मोहिते, कार्याध्यक्ष शंकरराव वावरे, संघटक दाजीराम मोहिते, सरचिटणीस रवींद्र कांबळे, खजिनदार दिपक कुलकर्णी, सहसंघटक राजाराम सूर्यवंशी, सहसंघटक विशाल सुतार, संघटनमंत्री कृष्णत मोकळे, सल्लागार राजेंद्र मोहिते. 
भारतीय जनता पक्ष वाहतूक आघाडी अध्यक्षपदी चिंतामणी शिर्के, उपाध्यक्ष विजय वाघ, उपाध्यक्ष रवींद्र देशमुख(गोपूजकर), खजिनदार संजय लोंढे, सरचिटणीस पवन खरात, संघटक प्रकाश कोळी, सहसंघटक आयुब शिकलगार, कार्याध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, भारतीय जनता युवा मोर्चा संघटना अध्यक्षपदी अमोल होलमुखे, उपाध्यक्ष कृष्णत पाटणकर, सागर कांबळे, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, संघटक उमेश जाधव, खजिनदार अमोल कांबळे, सरचिटणीस सचिन एडके, सहसंघटक अनिकेत कांबळे, सहसंघटक सिध्दनाथ मोहिते, संघटनमंत्री विशाल मोहिते यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच जेष्ठ नेते भानुदास शिंदे यांची वांगी शहर व्यसनमुक्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यांच्या निवडी करण्यात आल्या. 
यावेळी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भारतीय मजदूर संघ प्रदेश मंत्री विशाल मोहिते, माजी उपसभापती रवींद्र कांबळे, भारतीय जनता पक्ष अध्यक्ष हणमंतराव मोहिते, युवा नेते कृष्णत मोकळे, धनंजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष बाळासाहेब वत्रे, युवा नेते राजेंद्र मोहिते, शंकरराव वावरे, भानुदास शिंदे, अमोल होलमुखे, अभिजित देशमुख, विजय वाघ, सुभाष जाधव, अमोल जगदाळे, कृष्णत पाटणकर, विशाल सुतार, सिध्दनाथ मोहिते, हणमंत फडतरे, विजय देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमोल मोहिते यांनी सुत्रसंचलन केले. माजी उपसभापती रवींद्र कांबळे यांनी स्वागत केले. दिपक कुलकर्णी यांनी आभार मानले.



To Top