वांगी : डिजिटल हॅलो प्रभात
महावितरणाच्या गलथान कारभाराविरोधात सुधारणा न झाल्यास तोंडाला काळे फासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे कडेगाव पलुस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष व पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहाय्यक अभियंता काठाळे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात डी.एस.देशमुख म्हणाले की वीज महावितरणाचे कार्यकारी अभियंता हे शेतकऱ्यांनी भरलेल्या वीज बिलाच्या पैशातून भरगच्च पगार घेऊन देखील शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत, कोणत्याही शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत. शेतकरी तक्रार असल्याशिवाय कधीच अधिकाऱ्यांना फोन लावत नाही. व महावितरणाच्या कार्यालयात गेल्यावर बारा वाजेपर्यंत अधिकारी कामावर येत नाहीत. शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन, डीपी ट्रान्सफर, व अनेक समस्या महावितरणाच्या आहेत, त्या सोडवण्याचा कोणताही प्रकार महावितरणाकडून होत नसून शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला आहे.
निर्ढावलेले अधिकारी प्रशासन यांना जाग आली नाही किवा लोक प्रश्न तत्परतेने सोडवले नाहीत. तर महावितरण कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचारी हे लोकसेवक आहेत, परंतु यांच्यातील काही अधिकारी व कर्मचारी लोक आर्थिक भक्षक आहेत शेतकर्याची व नागरिकांची अडवणूक व पिळवणूक करत आहेत त्याविरुद्ध उपकार्यकारी अभियंता कडेगाव येथे अधिकारी प्रशासन यांच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तोंडाला काळे फासणे हा कार्यक्रम दि.०९/०६/२०२३ रोजी उपकार्यकारी अभियंता कडेगाव उपविभाग येथे करण्यात येणार आहे. याची सर्वस्व जबाबदारी कार्यकारी अभियंता विटा, उपकार्यकारी अभियंता कडेगाव उपविभाग, व सर्व कडेगाव तालुक्यातील शाखा अभियंता हे होणाऱ्या परिणामास जबाबदार राहनार असल्याचे डी.एस.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक विजय शिंदे, दीपक न्यायनीत, जीवण करकटे, दत्तात्रय भोसले, रघुनाथ गायकवाड, प्रवीण करडे, शशिकांत रास्कर, शिवाजी माळी, बजीरंग अडसूळ, नामदेव रास्कर, तानाजी भोसले, मोहन जाधव, आप्पासाहेब यादव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.