गारीवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वर्षात एकही डिलिव्हरी नाही : धक्कादायक प्रकार

Admin

 

गगनबावडा (किरण मस्कर)डिजिटल हॅलो प्रभात 
गनबावडा तालुक्यातील गारीवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण वर्षांमध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाही महिलेचे बाळंतपण झालेले नसल्याने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये गारीवडे प्राथमिक आरोग्य केंद्र असून हे आरोग्य केंद्र गेली 15 वर्षे ग्रामपंचायतच्या जुन्या इमारतीमध्ये कार्यरत आहे. सध्या या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी काम पाहतात आरोग्य विभागाकडे स्व:मालकीची इमारत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे मत येथील डॉ.सागर कुंभार यांनी व्यक्त केले आहे.तर या आरोग्य केंद्रामध्ये एकूण 26 गावांचा समावेश असून पाच उपकेंद्र कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रात 15 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 7 कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावायचे आहेत. अगदी दुर्गम व डोंगराच्या कुशीत हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात संपूर्ण वर्षांमध्ये एकाही महिलेचे बाळतपण झालेले नाही. तर या उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या पाच उपकेंद्रांमध्ये अवघ्या सहा महिलांची बाळंतपणे झाल्याची नोंद आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने मात्र इमारत व कर्मचारी नसल्याचा दावा केला आहे.जरी इमारत नसेल तर अन्य जवळपासच्या उपकेंद्रामध्ये डिलिव्हरी वाँर्ड उपलब्ध आहेत मग त्या ठिकाणी का नाही केल्या..? सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य केंद्राच्या समोर ॲम्बुलन्स लावण्याचे जागी खाजगी वडाप करणारी रिक्षा लावलेली असते तर अँम्बुलन्स इमारत नाही म्हणून शेजारी असणाऱ्या बावेली गावातील उपकेंद्रांमध्ये लावली जाते. या आरोग्य केंद्रात दिवसभरात 30-40 रुग्णांची तपासणी होते. तर अशा ठिकाणी मात्र शासनाने 5 कोटी 54 लाखाची तरतूद करून नवीन इमारतीचे काम सुरू आहे.यामध्ये एक आरोग्य केंद्र असून कर्मचारी निवासस्थान आहे. ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हाव्यात व त्यांची बाळंतपणे गावाघरी व्हावीत म्हणून दररोज शासन नवनवीन योजना राबवते. मग या उपक्रमाला मात्र गारीवडे आरोग्य केंद्र अपवादच म्हणावे लागेल.


To Top