जनावरे चोरणारी टोळी जेरबंद : पोलिस कॉन्स्टेबलची उत्कृष्ट कामगिरी

Admin


जयसिंगपूर :डिजिटल हॅलो प्रभात

                    जयसिंगपूर सह शिरोळ हातकलंगडे हुपरी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी टोळी गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले असून संशयताकडून चोरीची अकरा जनावरे ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शोध पथकाला यश आले आहे पोलिसांनी याप्रकरणी युवराज मल्लाप्पा तेली 24 आर के नगर सांगलीनाका इचलकरंजी व राहुल सनगुंडे 22 दत्तनगर डेक्कन गल्ली इचलकरंजी यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीसआले असून चोरीस गेलेल्या चार लाख 70 हजार रुपये किमतीची 11 जनावरे जप्त करण्यात आली आहेत
                    यावर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी चार मे रोजी निमशिरगाव तालुका शिरोळयेथून 45 हजार रुपये किमतीची जर्सी गाय चोरीस गेली होती. याबाबत अविनाश अनिल कोडोले व 31 यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता याचा तपास सुरू असताना मिळाले माहितीवरून युवराज मल्लाप्पा तेली आणि राहुल सनगुडे हे जनावरे चोरी करून बाजारात कमी किमतीला विकत असल्याचे निदर्शनास आले या कामात त्यांना राधा रुपेश तारळेकर वखार भाग इचलकरंजी या मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे रोहित डावाळे यांना गोपनीय बातमी मिळाली असता जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांची जनावरे चोरणारी टोळी सक्रिय असलेची कळलं पेट्रलिंग करत असताना रात्री दोन संशयीत यांची चौकशी केले असता ११ जनावरे चोरली कबूली दिली
                    अधिक तपास केला असता जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील दोन शिरोळ पोलीस ठाणे एक हातकणंगले पोलीस ठाणे दोन हुपरी पोलीस ठाणे एक आणि करवीर पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोल अवघडे वैभव सूर्यवंशी यांनीही कारवाई केली

To Top