अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी द्या : जैलाब शेख यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Admin

 

मिरज : डिजिटल हॅलो प्रभात
            नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मनात राग धरून अक्षय भालेराव या दलित तरुणाची जातीयवादी गुंडाद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली या क्रूर हत्याकांड घटनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून मिरज प्रांताद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले मिरज प्रांत ऑफिस मधील शासकीय अधिकारी आत्तार यांनी निवेदन स्वीकारले व आमच्या भावना शासनाला कळवतो असे सांगितले
या निवेदनात असे म्हटले आहे की मयत अक्षय भालेरावच्या कुटुंबियातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे तसेच पीडित कुटुंबाला दोन कोटी रुपयांची शासकीय मदत तात्काळ विना विलंब देण्यात यावी.
            या केस करीता प्रसिद्ध विधीतज्ञ उज्वल निकम या वकिलांची नियुक्ती करून जलद गती न्यायालय मार्फत केस चालवून पीडित भालेराव कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा तसेच आरोपींना मरेपर्यंत शिक्षा व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जैलाब शेख,दयानंद कांबळे,जमीर शेख,अविनाश शिंदे,नासिर शेख,राहुल श्रावसी, सात गवंडी अदीसह कार्यकर्ते उपस्थित होते
To Top