वांगी : डिजिटल हॅलो प्रभात
पाणी संघर्ष समिती व शेतकर्यां तर्फे कडेगाव महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता .शासनाने घरगुती व शेतीच्या वीज बिलामध्ये भरमसाठ वीज दरवाढ केल्या च्या निषेधार्थ,व ती वीज दरवाढ मागे घ्यावी, शेतकर्यांना शेतीला दिवसा अखंड आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेती साठी वीज कनेक्शन तात्काळ व भ्रष्टाचार न करता द्यावेत . कडेगाव शहर व भागातील लाईट दिवसा व रात्री सारखी जाते, त्याबद्दल लाईट न जाण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, जुने धोकादायक पोल, लाईट च्या तारा डी पी अपघात होऊ नये म्हणून दुरुस्ती करने बाबत, तसेच महावितरण कर्मचारी वेळेवर ऑफिसात हजर राहावे अश्या विविध मागण्यांसाठी पानी संघर्ष समिती अध्यक्ष डी ऐस देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्यांनी महावितरण अधिकारी यांना प्रश्न विचारून घाम फोडला होता. यानंतर महावितरण ने कडेगाव शहर व तालुक्यातील काही कामे मार्गी लावली आहेत तर काही कामे अपूर्ण आहेत. यावेळी महावितरण ने वरील राहिलेले प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी व ९ जून रोजी होणारे महावितरण विरोधात आंदोलन करू नये यासाठी महावितरण अधिकारी यांनी दि. ८ जून रोजी चर्चेला पाणी संघर्ष समिती अध्यक्ष देशमुख बापू व पाणी संघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते यांना आंदोलन करू नये, काही मागण्या पूर्ण केल्या आहेत व काही मागण्या ची कामे सुरू आहेत त्याबद्दल लेखी चर्चेनंतर देत आहोत असे आश्वासन दिले.