डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजे १० जुन.हा दिवस जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो.कवठे महांकाळ शहरात शिवविचार युवारणरागिणी निर्माण फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने या दिनाच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉक्टर हर्षला कदम म्हणाल्या,सध्याच्या काळात बदलणारी जीवनशैली,अनियमित दिनचर्या,प्रदूषण आणि वाढलेला मानसिक तणाव यामुळे बहुतेक लोकांना डोळ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.काही असेही दुर्दैवी असतात की ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधार असतो.अशा अंधारलेल्या लोकांच्या आयुष्यात नेत्रदानाने प्रकाश आणता येतो,त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देता येते.त्यासाठी नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन जग न पाहिलेल्या व्यक्तींना नेत्रदान करून त्यांना हे सुंदर जग पाहण्याची संधी देणे ही काळाची गरज आहे. या नेत्र तपासणी शिबिरावेळी डॉक्टर हर्षला कदम,मीनाक्षी माने,सुमन जाधव,हसीना मुजावर,उषाताई इरळे,सुनीता जगताप,शामल कोष्टी,अभिलाषा चंदनशिवे, बबुताई वाघमारे,छबुताई वाघमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी कवठे महांकाळ शहर तसेच परिसरातील उपस्थित महिलांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
जागतिक नेत्रदान दिनांनिमित्त नेत्र तपासणी शिबिर
June 11, 2023
कवठेमहांकाळ : डिजिटल हॅलो प्रभात
Share to other apps