जत आगाराच्या ताफ्यात नवीन २५ एस.टी.बसेस

Admin

 

जत : डिजिटल हॅलो प्रभात
            एस.टी. महामंडळ जत आगाराच्या ताफ्यात आलेल्या नवीन २५ एस.टी. बसेसचा लोकार्पण सोहळा आ.सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून सदैव धावणाऱ्या या एसटी बसेसचे महत्त्व आपण सर्वचजण जाणतो. मात्र जत आगारातील अनेक बसेस दुरुस्तीस आल्याने व काही बसेस कालबाहय झाल्याने नव्या बसेसची मोठी गरज होती. या नव्या २५ एसटी बसेस जत आगारात दाखल झाल्याने प्रवाशांना विशेषतः खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांन नोकरदार बांधवांना याचा लाभ होणार आहे. या एसटी बसेसचे लोकार्पण आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाबासाहेब कोडग, सुजय नाना शिंदे, बाबासाहेब माळी, अशोक बन्नेनवर, आगार प्रमुख कट्यारेजी, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक रामाघरे, महादेव कोळी, राजू यादव, परशुराम मोरे, निलेश बामणे, दिनकर पतंगे, प्रांत कट्यारे साहेब, गट विकास अधिकारी सरगर, सलिम पाच्छापुरे, यांच्यासह प्रमुख मान्यवर, एस.टी.महामंडळाचे चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते.
          
                विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या जत डेपोला प्रथमचं नव्या २५ बसेस मिळाल्या आहेत. यापुर्वी जून्या बसेस व अन्य डेपोला वापरलेल्या बसेसवरचं या डेपोचा भार होता. सातत्याने या बसेसबाबत प्रवाशाची नाराजी व्यक्त होत होती. यंदा मात्र सर्वाधिक बसेस मिळाल्याने आगाराचे वेळापत्रक व्यवस्थित होण्यास मदत मिळणार आहे. जत तालुक्यात नव्या कोर्या बसेस आता धावणार आहेत. यामुळे चालक, वाहकांसह कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
To Top