राज्यात सुख-समृद्धी, बंधुभाव नांदू दे : सुजित झावरे यांची पांडुरंग चरणी प्रार्थना

Admin

अ ह म द न ग र : डिजिटल हॅलो प्रभात (वसंत रांधवन)
            वारकरी संप्रदाय हा मानवतेचा व समतेचा संदेश देणारा असुन या संप्रदायाला मोठी संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरणात असुन महाराष्ट्रात सुख - समृद्धी व बंधुभाव नांदू दे अशी प्रार्थना अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पांडुरंग चरणी केली आहे.पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर श्री क्षेत्र पळशी येथिल विठ्ठल मंदिरात युवा नेते सुजित झावरे पाटील यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन पुजा करण्यात आली. 
            यावेळी त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. सुजित झावरे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या भक्तनिवास, सभामंडप, पेव्हींग ब्लॉक बसविणे, समाजमंदिर तसेच परीसर सुशोभीकरण करणेसाठी आजपर्यंत १ कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आज देखील सभामंडप लोकार्पण १५ लाख रुपये तसेच भाविक भक्तांना अन्नदानासाठी स्वयंपाक गृह बांधणे १५ लाख रुपयांचा कामांचा शुभारंभ सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
            आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून पंढरपूर मध्ये साधारण लाखो भाविक आले आहेत. पंढरपूरच्या वारीत सर्व लोक जात, धर्म, लहान,मोठा असा भेदाभेद विसरून एकत्र येतात आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे तसेच महाराष्ट्रात सुख समृद्धी, बंधूभाव नांदु दे अशी प्रार्थना ही सुजित झावरे पाटील यांनी पांडुरंग चरणी केली आहे. याप्रसंगी परिसरातील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर केला.
To Top