शिंदेच्या सभेअगोदर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

Admin

 


कोल्हापूर : डिजिटल हॅलो प्रभात

                    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. मोठ्या संख्येने तपोवन मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारण्यासाठी जाणार होते कार्यकर्ते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.कोल्हापुरात तपोवन मैदानावर राज्यातील सर्वात मोठा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे हे काही प्रश्न विचारणार होते. त्या संदर्भात त्यांनी लेखी परवानगी मागितली होती मात्र यानंतर त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या तरीही या नोटिसांना न जुमानता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत प्रश्न विचारायला जाणार असल्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी यांना रोखून जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

To Top