इचलकरंजी : डिजिटल हॅलो प्रभात
पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णीही वाहुन येत आहे. येथील लहान पुलाजवळ ही जलपर्णी मोठ्याप्रमाणात अडकली आहे. त्याचबरोबर नदीतून काढलेल्या जलपर्णीचा ढिग नदीकाठावर पडून आहे. पाणक्ष पातळीत वाढ झाल्यास जलपर्णीचा ढिग नदीत मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाजवळील जलपर्णीबरोबरच नदी काठावरील जलपर्णीचा ढिगही हटवण्याची मागणी होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह इतरत्रही पावसानं हजेरी लावली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.
इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीही वाढली आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्याप्रमाणात जलपर्णीही वाहून येत आहे. ही जलपर्णी लहान पुलाजवळ अडकून पडत आहे. ही जलपर्णी वेळीच काढली नाही तर त्या ठिकाणी जलपर्णीमुळं अनुचित घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान नदीतील वाढत्या जलपर्णीमुळे जलचरांच्या अस्तित्वाचा आणि नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने माणुसकी फौंडेशनने अथक 2 महिने पंचगंगा जलपर्णीमुक्तीसाठी प्रशासनाच्या सहकार्याने परिश्रम घेतले. मोठ्याप्रमाणात काढलेली जलपर्णी नदीकाठावरच पडून आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या जलपर्णीचा ढिग पुन्हा नदीत मिसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लहान पुलाजवळ अडकलेल्या जलपर्णीबरोबरच नदीतून काढलेल्या जलपर्णीचा ढिगही हटवण्याची मागणी होत आहे.