महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बुधवारी सांगलीत बैठक

Admin
विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांसाठी हवे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
                महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी दुपारी दोन वाजता सर्किट हाऊस विश्रामगृह माधवनगर रोड सांगली या ठिकाणी होत आहे.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्य संघटनेचे जेष्ठ सल्लागार शिवगोंड खोत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस सांगलीसह कोल्हापूर, इचलकरंजी,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनने या बैठकीचे नियोजन करत आहे.
                या बैठकीत शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या महामंडळामधील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समावेश याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. राज्य संघटनेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेत्यांसह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गठीत करावे या मागणीसाठी उभारण्यात येणाऱ्या व्यापक लढ्याचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीस राज्य संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रघूनाथ कांबळे, संघटन सचिव शाम थोरात,राज्य कार्यकारणीती सदस्य व माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे, राज्य कार्यकारणी सदस्य आण्णा गुंडे इचलकरंजी, राजेंद्र माळी सातारा, गणेश पवार सातारा यांच्यासह सांगली मिरज कुपवाड शहरासह सांगली जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा व शहरातील संघटना, इचलकरंजी वृत्तपत्र विक्रेता संघटना, सातारा जिल्हा व सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी त्याचबरोबर पंढरपूर बार्शी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके व सोलापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेता संघटना पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत, अशी माहीती राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य सचिन चोपडे यांनी दिली.
To Top