दमदार पावसाची अद्याप प्रतिक्षाच |
जुन महिना संपुन जुलै उजाडला तरीही केवळ ढगाळ वातावरण व पळणारे ढग वगळता कवठेमंहाकाळ तालुक्यातीलघाटमाथ्यासह तालुक्यात पावसाने चांगलीच पाठ फिरवल्याने दि. २७ जून अखेर केवळ ४.९९ % इतकीच चालू खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे.त्यामुळे खरीप हंगामाबाबत पुढे काय होणार ? याबाबत सध्या तरी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात रोहिणी,मृग अशी पावसाची एका पाठोपाठ एक नक्षत्र कोरडी गेली असुन.जुलै महीना उजाडला तरी ढगाळ वातावरण व पळणारे ढग वगळता पावसाची कोणतीही चिन्हे दिसेनात आसे झाले आहे.त्यामुळे शेतकरीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.घाटमाथ्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अद्याप खरीप हंगाम पिकांच्या पेरणी बाबत उदासीनता दिसत आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकरी ज्वारी,बाजरी,मका,तूर,उडीद,भुईमूग,सोयाबीन अशी पिके घेतात.संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात २१३७३.९४ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे, त्यापैकी दिनांक २७ जून अखेर केवळ १०६७.०४ हेक्टर इतकी खरीप हंगामातील पिकांची पेरणी झालेली आहे.तर घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,जाखपुर,कुची शेळकेवाडी या सात गावात १२२४ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे.यापैकी अत्यंत अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. कवठेमंहाकाळ तालुक्यात दमदार व जोरदार पाऊस पडल्यानंतर व जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच खरीप पिकांच्या पेरणीला वेग येणार असे चित्र आहे.सध्या मात्र खरीप हंगामाबाबत शेतकरी चिंताग्रस्त होऊन पावसाच्या प्रतीक्षेत आहे.