दताञय खेमनर यांची धनगर समाज विकास परिषदेच्या प्रदेशअध्यक्ष पदी निवड

Admin

 

श्रीरामपुर : डिजिटल हॅलो प्रभात (रमेश खेमनर)
            श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायत मा सदस्य तथा भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड चेअरमन व धनगर समाज संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष दताञय खेमनर यांची आखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. दताञय खेमनर हे गेल्या १४ वर्ष धनगर समाजाच्या न्याय हक्का साठी लढत आहे. धनगर समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समावेश करावा म्हणून खेमनर यांनी अनेक ठिकाणी धनगर समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. मेंढपाळांना वनक्षेञ मिळावे यासाठी पाठपुरावा खेमनर यांनी केला. सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव द्यावा म्हणून लढ्या मध्ये सहभागी तसेच अहमदनगर चे अहिल्यादेवी होळकर नामांतर लढ्या मध्ये सहभागी व महत्त्वाची भुमिका बजावली गेली. १३ वर्ष ते खा. डॉ. विकास महात्मे व बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून नगर मध्ये काम करत आहे. 
            या सर्व कामाची दखल घेऊन दताञय खेमनर यांची आखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्त केले. खेमनर यांच्या निवडी बदल श्री श्री १००८ परमहंस कालीदास बाबा बालयोगी महेश्वरानंद महाराज महंत स्वामी अरूणाथगिरी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील, मा खा डॉ विकास महात्मे राष्ट्रीय श्री राम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग, स्वारद फाऊंडेशन धर्मरक्षक शरदभाऊ मोहळ, उद्योजक मचिन्द कांडेकर, उद्योजक प्रसाद म्हसे-पाटील, उद्योजक सुदाम लोंढे, मा जि प सदस्य शरद नवले, मा सभापती दिपक पटारे, मा. उपसभापती बाळासाहेब तोरणे, अॕड. पालवे, मेजर अमोल बोचरे यांनी अभिनंदन केले. 
To Top