निशिकांतदादांच्या समवेत कार्यकर्त्यानी केला खरडा-भाकरीचा बेत

Admin

 

इस्लामपुर :डिजिटल हॅलो प्रभात
                    इस्लामपुर विधानसभा प्रमुख निशिकांत भोसले- पाटील यांच्या समवेत भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ अध्यक्ष,शक्तीकेंद्र प्रमुख यांनी टिपीन बैठक निमित्त खरडा भाकरी बेत आखला होता,असंख्य कार्यकर्त्याच्या समवेत निशिकांत दादांनीही या नियोजनात सहभागी होऊन सर्वाचाच उत्साह वाढवत जुन्या आठवणींना उजाळा दिला.इस्लामपुर विधानसभा मतदार संघात निशिकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली मोदी @ ९ अभियान अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ अध्यक्ष,शक्तीकेंद्र प्रमुख यांनी एकत्रीत भारतीय बैठक मारत भारतीय संस्कृतीतील पदार्थाचा आस्वाद घेतला.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संपुर्ण मतदार संघात चांगलीच चर्चा रंगली.
                    यावेळी निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले,देशातील मोदी सरकारने देशाच्या सार्वगिण विकासाबरोबर भारतीय संस्कृतीचे महत्व आबाधीत ठेवण्याबरोबर या संस्कृतीचा आदर संपुर्ण देशभर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.भारतीय बैठकीमध्ये आपल्या सर्वासमवेत भोजन करताना आपल्या कुटुंबाबरोबर बसल्याचा विशेष आनंद होत आहे.भारतीय संस्कृती व आपल्या देशातील आहाराचा अनेक देश आदराने स्विकार करतात,असे एकत्रीत बसुन आहाराचा आनंद घेतल्याने एकमेकाबद्दल प्रेम व आदराची भावना तयार होते.प्रत्येकाच्या धावपळीच्या जीवनात असे एकत्रीत बसुन भोजनाचा आनंद घेण्याचे दुर्मीळ क्षण येतात,मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना टिपीन बैठकीचा संदेश देत प्रेम,आदर व माणुसकी जपा असाच संदेश दिला असल्याचे सांगत अनेक जुन्या आठवणींना निशिकांतदादांनी उजाळा दिला.
                    यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,उपाध्यक्ष निवास पाटील,भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार,भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,युवा मोर्चा चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,भाजपा शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट,प्रांजली अर्बन बॅकेचे चेअरमन अक्षय पाटील,अक्षय कोळेकर,संदीपराज पवार,गौरव खेतमर,अल्ताफ तहसिलदार,प्रमोद डांगे,सुभाष जगताप,शरद पाटील,अनिकेत,पाटील,आनंदराव पाटील आदिसह अन्य मान्यवर,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ अध्यक्ष,शक्तीकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
To Top