करवीर : डिजिटल हॅलो प्रभात
करवीर तालुक्यातील कांचनवाडी या गावातील कु.क्रांती सागर कांबळे हिने आपल्या तीन भांवडांचे प्राण तुळशी नदीत बुडताना वाचवले.अशी प्रसारित झालेली बातमी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाहून १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कु.क्रांती सागर कांबळे ने केलेल्या धाडसा बद्दल तिचा सत्कार मंत्री रामदास आठवले यांनी केला.
आजवर क्रांती चा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर ,कोल्हापूर चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार,मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे , वैद्यकीय सहाय्यक स्वरूप काकडे , वि.म.कांचनवाडी शाळा यासह अनेक मोठ मोठ्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी क्रांती च्या कार्याचे कौतुक करून सत्कार ही केला.