वाळव्यात शेतात गांजाची २१ झाडे पकडली |
आष्टा पोलिसांनी वाळवा ते नागठाणे जाणाऱ्या डांबरी रोड लगत असलेले शेत जमिनीत बेकायदेशीर व विनापरवाना लावलेले गांजाची 21 लहान मोठी झाडे हस्तगत केली. यावेळी गांजाची झाडे लावणाऱ्या इसमाला पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले व एकूण 47 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईचे आष्टा परिसरात परी पोलीस उपअधीक्षक मनीषा कदम यांचे तसेच पोलीस डिपार्टमेंटचे कौतुक होत आहे.
हर्षवर्धन सुभाष होरे वय वर्ष 37 राहणार कोटभाग वाळवा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर साळुंखे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दोन किलो 900 ग्रॅम वजनाचे 21 गांजाची हिरवी रंगाची झाडे तसेच देशी बनावटीची स्टीलची पिस्तुल मॅक्झिन असलेले आणि एक पिवळसर धातूचा जिवंत राऊंड असा एकूण 47 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आष्टा पोलिसांनी गुंगीधारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार करावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे अन्वये हर्षवर्धन होरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, इस्लामपूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणावर पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम सहायक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, महेश गायकवाड पोलीस उपनिरीक्षक दिनकर महापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर साळुंखे ,संजय सनंदी, सुरज थोरात, अमरसिंह सूर्यवंशी, प्रवीण ठेपणे, दीपक भोसले, रूपाली पाटील, अश्विनी लुगडे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास प्रशिक्षणार्थ पोलीस अधिकारी उपअधीक्षक मनीषा कदम करीत आहेत.