तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना

Admin

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; तम्मनगौडा रवीपाटील यांनी घेतली मुंबईत भेट
जत : डिजिटल हॅलो प्रभात (पांडुरंग कोळळी)
            जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. तम्मनगौडा रवीपाटील हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज तालुक्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले. जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून पिण्याचे पाणी तसेच जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगाम वाया गेला आहे. या दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. त्याशिवाय म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करून कालव्यामधून पाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणीही रवीपाटील यांनी केली.
            रविपाटील यांनी दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या मांडण्यात आल्या आहेत, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून कालव्यातून पाणी सोडावे, जनावरांसाठी चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्यात यावेत, टंचाई आराखडा तयार करण्यात यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावित, मागेल तेथे टॅंकर सुरू करण्यात यावेत, शेतकऱ्यांना विशेष अनुदान देण्यात यावे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे रवी पाटील यांना सांगितले.

To Top