मिरज येथे ,भरडधान्य उत्पादित करणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार

Admin
मिरज : डिजिटल हॅलो प्रभात
            केंद्र सरकारने चालू वर्ष भरडधान्य वर्ष जाहीर केले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उपक्रम भाजपच्यावतीने राज्यात राबवण्यात येत आहे. मिरजमध्येही महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वाती शिंदे यांच्या मार्गदर्शना नुसार भरड धान्य उत्पादित करणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
            यावेळी मिरज येथील भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी शेतकरी,श्रीकांत पांढरे, प्रकाश पांढरे राम यादव,सुशीला यादव,नरसिंग सपकाळ, धान्य विक्रेते ऐश्वर्या यादव यांचा घरी जाऊन त्यांचा पुप्षगुच्छ ,महिलांसाठी ओटी आणि मिठाई देऊन सत्कार केला. तसेच,देऊळगावकर यांची नंदिनी मेस  प्रियांका यादव यांचे मोरया पोळी भाजी केंद्र त्यांचे आभारही मानले.त्यांच्या कामाचे कौतुकही केले ,यावेळी भाजपच्या , पूर्व मंडळ कोषाध्यक्ष अनघा कुलकर्णी आणि उपाध्यक्ष
सुप्रिया जोशी यांनी आहारातील भरड धान्यांचा वापर कमी झाल्याने प्रत्येक कुंटूबास विविध आजारांचा सामना करावा लागत आहे; रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी, राजगिरा यासारख्या भरड धान्यांचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.यावेळी भाजप पदाधिकारी अमृता पांढरे ,वैशाली पांढरे, गजानन सपकाळ धान्य आदी उपस्तीथ होते
To Top