उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अंकुशचे आंदोलन : धनाजी चुडमुंगे

Admin
१५ दिवसात पैसे न दिल्यास बेमुदत गेट बंद आंदोलन करू
शिरोळ : संदीप इंगळे
        गत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता ५०० रूपये मिळायलाच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी,ता.शिरोळ) कारखाना मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.भर पावसात देखील आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवत ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्या या मागणीवर ठाम होते.दरम्यान कारखानदारांशी झालेल्या चर्चेत १५ दिवसात सर्व साखर कारखान्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे,या बैठकीनंतर योग्य तो निर्णय कळवू असे कारखाना व्यवस्थापनाने आश्वासन दिले.
        यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांना ५०० रुपये दुसरा हप्ता न दिल्यास बेमुदत कारखाना गेट बंद करण्याचा इशारा दिला. यावेळी तालुका अध्यक्ष दिपक पाटील,रघुनाथ पाटील गुरुजी, दत्तात्रय जगदाळे,अजित पाटील,आप्पा कदम, संतोष मिरजे,प्रवीण माने, विनायक पाटील ,पिंटू ढेकळे,महेश जाधव, विशाल पाटील, पोपट संकपाळ, संताजी पाटील जयसिंग राजपूत, रशीद मुल्ला ,प्रवीण जगनाडे, सचिन पाटील, अविनाश लाड अमोल शिरहट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभागी झाले होते.
To Top