जीवन प्रवास एका शेतकरी कुटुंबातील मुलाचा !

Admin

     

डिजिटल हॅलो प्रभात

        करण बाबाजी राळे यांनी अवघ्या १९ व्या वर्षी वि .पि गव्हर्नमेंट कंट्रक्शन जॉईन केलं. कोविड काळ असल्यामुळे पाहिजे तेवढा पगार भेटत नव्हता. करण ने तीन महिने सिक्युरिटी देखील नोकरी केली. त्यानंतर करण चा काम करण्याचा अनुभव आणि सर्वांशी समंजस पणे बोलणं यामुळेच करण राळे यांना ऑफिस स्टाफ वरती घेण्यात आले. राळे यांना वयाच्या १९ व्या वर्षी अनेक प्रकारची ग्रुप फाउंडेशनची पदे देण्यात आली. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य खेड तालुका अध्यक्ष तसेच मानवाधिकार समिती पुणे जिल्हा अध्यक्ष अशी पदे देण्यात आली. करण राळे यांनी कमी वयामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी आपली मित्र परिवाराच्या सहाय्याने एकी वाढवली त्या एकीतूनच करण राळे यांचा जुन्नर तालुक्यामध्ये एक उद्योग समूह देखील आहे.

         वी.पी.गव्हर्नमेंट कंट्रक्शन मधून मिळणारा पैसा हा अनाथ आश्रमांना देखील जात होता. समाजसेवेमध्ये देखील तरबेज असणारा करण आज यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचला. एका शेतकरी कुटुंबातील पोरगा राजगुरुनगर लगत असणाऱ्या छोट्याशा कोये गावामध्ये १२ एप्रिल २००२ रोजी करन राळे यांचा जन्म झाला. या छोट्याशा करणं संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आणि समाजसेवेची ओढ असणाऱ्या करण ला ४ एप्रिल २०२१ मध्ये सहा तास लॉकप मध्ये ठेवण्यात आलं होतं. 

         त्यानंतर राळेना सोडवण्यासाठी ठिकठिकाणी कॉल येण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून तर आत्तापर्यंत राळे हे सोशल वर्कर म्हणून ओळखले गेले. गव्हर्नमेंट कन्ट्रक्शन मध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी राळे यांच्या आयुष्यात घडवून गेल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ मोठ्या राजकीय लोकांशी देखील करण चे संबंध आहेत. क्षेत्र कुठलेही असो त्यामध्ये राळेंचं नाव हे येतच. राजकारण असेल समाजसेवा असेल सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केल आहे.राळेंना नेहमीच प्रत्येक गोष्टी मध्ये पाठिंबा देणारे वी.पी.गव्हर्नमेंट कंट्रक्शन चे सर्वेसर्वा वसंतराव वर्पे,खासदार ओमराजे निंबाळकर साहेब टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी भाऊ जाधव,गोल्डमॅन संजयभाऊ खंडागळे,भावी आमदार बाबाजी शेठ काळे-पाटील, या सर्व व्यक्तींच्या सहकार्यातून राळे हे आपले कार्य करत आहे. राळे यांनी २०२१पासुन आपली ओळख लपवून आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काम करत होते. जुन्नर आणि आंबेगाव या ठिकाणी करन यांना सूर्या या नावाने ओळखले जाते. एवढेच काय तर ज्या ज्या वेळी राळे आंबेगाव किंवा जुन्नर या ठिकाणी येतात त्यावेळी चाळीस ते पन्नास युवक त्यांच्या समवेत असतात. भविष्य काळामध्ये नक्कीच राले हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणार याची युवकांना जाणीव आहे. राळे हे सर्व धर्मातील लोकांच्या मध्ये काम व सर्वधर्माच्या सणांमध्ये सामील होऊन स्वतःचं ओळख निर्मान करून लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. येत्या काही दिवसातच राळे हे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातील यात शंकाच नाही....!

- मायरा जगताप
वि.पी.गव्हर्नमेंट कंट्रक्शन
To Top