लंपी आजारांवर उपचार व मार्गदर्शन संपन्न

Admin

पंढरपूर : बाळासाहेब लोखंडे
        तिसंगी (ता. पंढरपूर) येथील आण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी या विद्यालयात महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभाग व ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी. डॉ.विश्वासराव मोरे
(ज्येष्ठ पशुवैद्यकीय प्रतिष्ठान पंढरपूर) डॉ.ऋषिकेश रसाळे पशुवैद्यकीय अधिकारी (रोपळे), दीपक चंदनशिवे
(प्रदेश संघटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माजी सरपंच तिसंगी) तसेच वरील डॉक्टरांनी आज विद्यालयाला सदिच्छा भेट दिली व भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या देशांमध्ये पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. केल्या पाहिजेत याविषयी ग्रामस्थांना व विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य वामनराव शेळके सर पर्यवेक्षक प्रमोद खरात सर, आबासो सलगर सर सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
To Top