इस्लामपूर शहरांमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेमध्ये सहभागी नागरिकांना निशिकांत दादा युथ फाऊंडेशनच्यावतीने मिठाईवाटप करण्यात आली व पैगंबर जयंती निम्मित सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निशिकांत दादा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय भोसले-पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. तसेच यावेळी ॲड.अमित वेटम, फिरोज पटेल व मिलिंद आढाव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जलाल मुल्ला (पैलवान) अल्ताफ भैय्या तहसीलदार, संदिपराज पवार, गौरव खेतमर, भास्कर चव्हाण, अक्षय कोळेकर, जफर खाटीक, सोमनाथ जाधव, मुकुंद रास्कर, संजय जाधव, सनम मगदुम, इनायतुल्ला महाब्री, अरमान इनामदार, सलाउद्दीन जमादार, सिकंदर पटेल, शोएब मुल्ला, इम्रान शेख, सलमान इनामदार, प्रदिप कांबळे, आनंदा जाधव, शुभम जाधव, तसेच बहुसंख्य युवक उपस्थित होते.