समध्येय कला क्रीडा मंडळातर्फे विविध स्पर्धेचे आयोजन

Admin

शिराळा : डिजिटल हॅलो प्रभात
        शिराळा येथील समध्येय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून विनायक गायकवाड , वैभव कांबळे , धनाजी चव्हाण ,शुभम महामुनी , प्रमोद लोहार उपस्थित होते . मंडळातर्फे चित्रकला ,हस्ताक्षर स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते .चित्रकला स्पर्धा मोठा गट यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी तनिष्का दीपक नलवडे व द्वितीय क्रमांक रेहान शब्बीर मुंडे व तृतीय क्रमांक कार्तिक संतोष महाडिक या विद्यार्थ्यांनी पटकविला ..मध्यम गटात आदर्श जिरंगे प्रथम क्रमांक जुब्बल मुंडे गीते क्रमांक शिपा मुकादम तृतीय क्रमांक मिळाला .लहान गट चित्रकला स्पर्धा प्रथम ऋतुराज रमेश जाधव द्वितीय अक्षरा संदीप देवकुळे व तृतीय स्वाती सोनाप्पा नलवडे या विद्यार्थ्यांना मिळाला .हस्ताक्षर स्पर्धा लहान गट प्रथम क्र .स्वाती सोनाप्पा नलावडे द्वितीय रसिका नलवडे व व तृतीय क्रमांक आयाज शबीर मुल्ला यांनी पटकाविला आहे .हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट रिजवाना अलाउद्दीन मुंडे द्वितीय क्रमांक तनिष्का दीपक नलवडे आणि तृतीय क्रमांक कार्तिक संतोष महाडिक मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक शिफा मुकादम द्वितीय क्रमांक रुद्र सुतार व तृतीय क्रमांक प्रदीप तोंडले या विद्यार्थ्यांनी पटकविला आहे .
        या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विनायक गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व प्रयत्न या तीन गुणांची सांगड असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊ शकाल .विविध परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हस्ताक्षर सुंदर असणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन गायकवाड यांनी केले . .प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष श्री मोहन जिरंगे यानी तर प्रास्ताविक पवन वासुलकर यांनी केले सूत्रसंचालन श्री दीपक नलवडे यांनी केले व आभार रोहीत परदेशी यांनी मानले .कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
To Top