चिकुर्डे-डोंगरवाडी-देवर्डे सोसायटीची सभा खेळीमेळीत

Admin


कोकरूड : नारायण घोडे-पाटील
        चिकुर्डे डोंगरवाडी देवर्डे विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नेते वारणा कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड होते. सभेस सांगली जिल्ह्याचे युवा नेते अभिजीत पाटील, माजी सरपंच व सोसायटीचे माजी चेअरमन केरू आबा पाटील व विद्यमान चेअरमन बाबासाहेब खोत माजी सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष कृष्णा पवार व संचालक सभासद व संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        श्रीनिवास डोईजड म्हणाले, अभिजीत पाटील यांचे पंजोबा व चिकुर्डे गावचे स्वर्गीय रघुनाथ बाळाजी पाटील यांनी पाच सहा १९१७ साली महाराष्ट्रात कोठेही सहकार क्षेत्र नसताना शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सहकार तत्वावरील पहिली सोसायटी स्थापन केली. त्यावेळी कै चंदुलाल बापू तांबोळी हे सचिव होते तर अली बाई माणिक मुलांनी हे शिपाई होते. त्या वेळेपासून संस्थेची प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सोसायटीने केले आहे. सभेचे वाचन सचिव कृष्णात कृष्णात मते यांनी केले. चेअरमन बाबासाहेब खोत यांनी शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज व सोसायटी भागवून सहकार्य करावे. संस्था नेहमी सभासदांच्या हिताच प्राधान्य देईल. व त्यांनी यावर्षी सात टक्के बोनस सभासदांना जाहीर केला. स्वागत व प्रास्ताविक संचालक तोडकर सर यांनी केले. आभार संचालक केरुवाबा पाटील यांनी मानले. सभेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी व सभासद उपस्थित होते.

To Top