बहादूरवाडी : रविंद्र लोंढे
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियानाच्या निमित्ताने भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अभियान इस्लामपूर शहर भाजप तर्फे मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून इस्लामपूर शहरातील ख्रिश्चनबंगला परिसरातील असलेला अस्वच्छ परिसर पूर्णपणे सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, सदस्य व इस्लामपूर नगरपरिषद कर्मचारी मिळून स्वच्छ करण्यात आला. व स्वच्छता विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस संदीपराज पवार, भाजपा ओबीसी मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस अल्ताफ भैया तहसीलदार, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्य गौरव भाऊ खेतमर, अल्पसंख्यांक मोर्चा संयोजक फिरोज पटेल, भाजपा इस्लामपूर शहर चिटणीस सोमनाथ जाधव, युवा मोर्चाचे मिलिंद आढाव, योगेश यमगर, मयूर कदम, नगरपरिषदेचे ताटे साहेब, टेके साहेब तसेच बहुसंख्य युवक उपस्थित होते.