जिल्हा युवा महोत्सवाचे व्यासपीठ हे कलाकार निर्माण करणारे : डॉ. गायकवाड

Admin

 

मुरगूड : डिजिटल हॅलो प्रभात
        जिल्हा युवा महोत्सवाचे व्यासपीठ हे आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण करणारे कलाकार निर्मितीचे शाश्वत व्यासपीठ असून गेल्यावर्षी या माध्यमातूनच शिवाजी विद्यापीठाच्या २३ कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादरीकरणाची संधी मिळाली याचा विद्यापीठाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.पी.टी.गायकवाड यांनी काढले.येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्रांगणातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक सांस्कृतिक मंचावरील आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे सचिव क्रांतीसिंह पवार-पाटील, आजरा नगर पंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी, सुमित चौगुले, कुडित्रेचे युवा नेते देवराज नरके, यांच्यासह ऋषिकेश पाटील (सोनारवाडी), पी.के.गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
        स्वागत मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक वाटचाली विषयी माहिती देऊन महाविद्यालयाच्या प्रगत वाटचालीची माहिती दिली व महोत्सव यशस्वी करणाऱ्या सर्व घटकांना त्यांनी धन्यवाद दिले.खासदार संजय मंडलिक व युवा नेते अॅड वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला लोकनेते सदाशिवराव मंडलिक सांस्कृतिक व्यासपीठ मंच हा जिल्ह्यासह राज्यातील अनेक कार्यक्रमांचा साक्षीदार बनेल." असा विश्वास आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी व्यक्त केला

To Top