सांगलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Admin


पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाची करवाई
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात

        महापालिका हद्दीतील कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत वरील मजल्यावरील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. हा जुगार अड्डा चालवणाऱ्यांच्या सह ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारला. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत त्यानुसार उपाधीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. रविवारी दुपारी पथकाला कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये सांगली, नांदणी, शिरोळ, नांद्रे, मिरज, कवठेमहांकाळ, कवठेपिरान, उमळवाडसह कर्नाटकातील जमखंडी, चिक्कोडी परिसरातील जुगाऱ्यांचा समावेश आहे.

To Top