वुमेन्स प्रीमियर लीग 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात
बहुचर्चित आणि पहिल्या सीझन पासूनच लोकप्रिय ठरलेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या सीझनचे संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. गेल्या सीझनला विजेतेपद मिळवलेले मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पहिली लढत असणार आहे. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा पहिला सामना आयोजित करण्यात येईल..
WPL म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग 2024 हे 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 23 तारखेला पहिला सामना असेल, तर 17 मार्च रोजी दिल्लीमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. यावर्षीच्या वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये एकूण 22 सामने होणार आहेत. हे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत.
पाहा संपूर्ण वेळापत्रक
23 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
24 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स
25 फेब्रुवारी - गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
26 फेब्रुवारी - यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
28 फेब्रुवारी - मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
29 फेब्रुवारी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स01 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
02 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
03 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
04 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
05 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स06 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
07 मार्च - यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
08 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
09 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
10 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
11 मार्च - गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स12 मार्च - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
15 मार्च - एलिमिनेटर मॅच
17 मार्च - अंतिम सामना.
23 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंतचे सामने बंगळुरूमध्ये होणार आहेत, तर त्यानंतरचे सर्व सामने दिल्लीमध्ये होणार आहेत. त्याच बरोबर यावर्षीच्या वुमेन्स प्रीमियर लीगचा फॉरमॅट देखील मागच्या सीझनप्रमाणेच असणार आहे. लीग राउंडमधील टॉप तीन टीम्स प्लेऑफमध्ये जातील. यातील पहिल्या क्रमांकावरील टीम थेट फायनलला जाईल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या टीममध्ये एलिमिनेटर मॅच खेळवली जाईल.