गँगस्टर शरद मोहोळ हत्याकांडात ; 8 आरोपींसह 2 वकिलांना अटक... चित्तथरारक हत्याकांडाचा व्हिडीओ पहा

Admin
पुणे : डिजिटल हॅलो प्रभात
पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरूड परिसरात गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. यानंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये दोन वकिलांचा सुद्धा समावेशआहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हात्येनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना काल रात्री अटक केली होती. एकूण 8 आरोपींपैकी 2 आरोपी वकील आहेत. आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. या सहा आरोपींचा वकीलपत्र आम्ही घेतलं होतं म्हणून आम्हाला अटक करण्यात आली.
To Top