'कुकटोळी'च्या डे.सरपंचपदी शिवाजी कारंडे

Admin

'कुकटोळी'च्या डे.सरपंचपदी शिवाजी कारंडे
 
डिजीटल हॅलो प्रभात : अरुण एडके
कुकटोळी गावचे माजी सरपंच मा. शिवाजी विठोबा कारंडे यांची कुकटोळी ग्रामपंचायत च्या डे.सरपंच पदी निवड झाली. डे.सरपंच लता राजाराम बोराडे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. त्यानंतर सदर पदावर माजी सरपंच शिवाजी कारंडे यांची बिनविरोध निवड झाली.

गेल्याच वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माजी पाटबधारे राज्यमंत्री अजितरावजी घोरपडे व युवा नेते राजवर्धन घोरपडे -सरकार यांच्या नेतृत्वाखालील माजी जिल्हा परिषद सदस्य व लोकनियुक्त सरपंच तानाजी यमगर यांचे श्री गिरलिंग शेतकरी विकास आघाडी पॅनेल विजयी झाले होते. नूतन डे. सरपंच यांनी निवडी नंतर सर्व सदस्यlना विश्वासात घेऊन गोरगरीब जनतेची सेवा करून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबद्ध राहीन असा विश्वास व्यक्त केला. निवडी नंतर लोकनियुक्त सरपंच तानाजी दादा यमगर व माजी सभापती अजित कारंडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत देवकते यांनी केले व आभार शेळके यांनी मानले.

 

यावेळी लोकनियुक्त सरपंच तानाजी दादा यमगर, माजी सभापती अजित कारंडे, माजी सरपंच प्रशांत देवकते, माजी डे. सरपंच लता बोराडे, महेश देसाई,ग्रामपंचायत सदस्य स्वाती देसाई,रावसो पाटील, माया चौगुले, राजाराम म. पाटील, कल्पना चौगुले, विद्या उत्तरे, शेवंता चव्हाण,विकास सोसायटी संचालक अजित हाक्के, मारुतीराव आकाराम कारंडे सर विद्यालयाचे अध्यक्ष विरेंद्र कारंडे,यासराव शेळके सर, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड, तुळशीराम निकम व इतर ग ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top