पेठ येथे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन
३५ व्या वर्षात पदार्पण : विविध मान्यवरांची उपस्थिती
पेठ (ता.वाळवा) येथे सालाबादप्रमाणे या वर्षी ही दिनांक २७ जानेवारी ते ३० जानेवारी या दरम्यान यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे प्रमुख अरुण कदम,डॉ.सचिन पाटील,मनोज पेटकर यांनी दै.हॅलो प्रभात शी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले व्याख्यान मालेचे हे ३५ वे वर्ष असून गेली ३४ वर्षे ही व्याख्यानमालाअविरत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,या व्याख्यान मालेच्या मंचावर मोठमोठ्या थोर विचारवंतानी तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांनी आपली हजेरी या व्याख्यानमालेस लावली आहे. या व्याख्यानमालेत शनिवार दि.२७ रोजी महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त डॉ.जयानंद नलावडे यांचा 'चला जिंकूया मनाला' व हिप्नॉटिझमचा कार्यक्रम होणार आहे.
राजारामबापू सह. साखर.कारखान्याचे संचालक अतुल पाटील अध्यक्षस्थानी आहेत तर पेठचे सरपंच डॉ. सुभाष भांबुरे प्रमुख पाहुणे आहेत.रविवार दि.२८जानेवारी रोजी ज्ञानभास्कर १०८ महादेव शिवाचार्य स्वामी,वाई यांचे 'विज्ञान आणि अध्यात्म' हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी प्रदेश भाजपचे कार्यकारी समिती सदस्य सम्राट महाडिक हे अध्यक्ष आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मनीष माळी व वनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील हे प्रमुख पाहुणे आहेत.
सोमवार दि.२९ जानेवारी रोजी अभय भंडारी यांचे 'भारतीय संस्कृती आणि कुटुंब' व्यवस्था या विषयावर व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच पै.जयंत पाटील हे असतील. मंगळवार दि.३० रोजी संगीतरजनी या कार्यक्रमांतर्गत रवींद्र केंजळे, सातारा यांचा 'साज' हा मराठी-हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.यावेळी आत्मशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.अभिराज पाटील हे अध्यक्षस्थानी असतील तर कृष्णा बँकेचे माजी संचालक फिरोज ढगे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यावेळी सुनील पाटील यांना आदर्श शिक्षक,स्वप्निल चव्हाण सातारा यांना उद्योगरत्न, सौ.अनिता पाटील,यांना आदर्श शिक्षक तसेच डॉ. प्रवीण पोरवाल,यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
ही व्याख्यानमाला पेठ येथील बाजारपेठ चौक या ठिकाणी होणारा असून सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही अरुण कदम,डॉ. सचिन पाटील,मनोज पेटकर, यांनी यावेळी केले.या व्याख्यानमालेचे प्रमुख संयोजक म्हणून अरुण कदम,डॉ.सचिन पाटील,तसेच मनोज पेटकर,हे काम करतील तर त्यांच्याच संयोजनाखाली व मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे.