आधी मोदींची औरंगजेबाशी तुलना ; नंतर राऊतांच्या टीकेला मोदींचे वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर

Admin

आधी मोदींची औरंगजेबाशी तुलना 
राऊतांच्या टीकेला मोदींचे वेगळ्या पद्धतीने प्रत्युत्तर

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे आणि अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फायरिंग पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. राऊतांच्या या टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली आहे. मोदींनी वेगळ्या पद्धतीनं राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मोदी सरकार सध्या गेल्या दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड देशवासियांशी शेअर करत आहे. अशातच विरोधी पक्ष सातत्यानं पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेत्यांच्या या टीकेला आणि टिप्पण्यांना नेहमीच वेगळ्या पद्धतीनं उत्तर देतात. बुधवारी मोदींनी एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,आज विरोधकांनी 104 व्यांदा मोदींना शिवीगाळ केली. औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला. असं म्हणत मोदींनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. 


 

दै.हॅलो प्रभात : आजचा ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की, औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता. त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अशा परिस्थितीत आता खुद्द मोदींनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.



Tags
To Top