शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर ; पहिल्या यादीत आठ उमेदवारांची घोषणा

Admin
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर 
पहिल्या यादीत आठ उमेदवारांची घोषणा 

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या उमदेवार यादीत एकूण 8 जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे. याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

पहिल्या यादीत  आठ उमदेवार  
मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
हिंगोली - हेमंत पाटील
मावळ - श्रीरंग बारणे
हातकणंगले - धैर्यशील माने
कोल्हापूर - संजय मंडलिक
शिर्डी - सदाशिव लोखंडे
रामटेक - राजू पारवे
बुलढाणा - प्रतापराव जाधव


कोणत्या पक्ष्याचे किती उमेदवार रिंगणात ? 
राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजपने सर्वाधिक 24 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 12, शिवसेना ठाकरे गटाने 17 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याशिवाय प्रकाश आंबडेकर यांनी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली.
Tags
To Top